Page

मदधुंद दुचाकी स्वाराने सायकल स्वारास दिली जबर धडक


सह्याद्री चौफेर | रवि घुमे 
9637202778

मारेगाव : आज सायंकाळी 6.15 वाजता गौराळा खदान फाट्यावर अशोक विठ्ठल आत्राम रा. राजूर इजारा ह्या दुचाकी स्वाराने स्वतःच्या मालकीच्या MH 29 W 3960 ह्या क्रमांकाच्या दुचाकीने सायकल स्वार भैयाजी भोयर रा. मांगरूळ यांना मागून धडक दिली. यात सायकल तथा दुचाकीचे किरकोळ नुकसान झाल्याचे आढळून आले तसेच दोघांनाही किरकोळ जखमा झाल्याचा अंदाज आहे. सायकल स्वारास पाठ व कमरेला मुका मार होता तर, दुचाकी स्वाराचे तोंड, ओठ व डोक्याला मार लागल्याचा अंदाज आहे.

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. थातूर माथुर चौकशी करून जखमीला ऑटोत टाकण्याचा प्रयत्न केला, ऑटो चालकाने नकार दिल्या नंतर पोलिसांनी ही घटना स्थळवरून काढता पाय घेत निघून गेले. बातमी लिहीपर्यंत तक्रार दाखल झाली की नाही हे कळले नाही.