टॉप बातम्या

सावर्ल्या जवळ विवाहित तरुणाचा अपघातात मृत्यू

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : येथील रिलायन्स मॉलच्या डिपार्टमेंट मॅनेजरचे अपघाती निधन झाले, ते रात्री साडे दहाच्या नंतर आपले कर्तव्य आटोपून रात्री वरोरा येथील निवासी दुचाकीने जात असताना रुग्णवाहिकेने सावर्ला नजीक जोरदार धडक दिली. यात 37 वर्षीय विवाहित तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

आनंद झा (37) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो वणी येथील रिलायन्स मॉल मध्ये गेल्या दोन वर्षांपासून डिपार्टमेंट मॅनेजर पदावर म्हणून कर्तव्यावर होता. मूळ माजरी येथील तर सध्या वरोरा येथे वास्तव्यास असल्याने दुचाकीने ये-जा करायचे. नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावर आला होता. रात्री मॉल बंद झाल्यावर आपल्या दुचाकीने वरोरा येथे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली. 

अपघात इतका भीषण होता की,यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून दुचाकीने पेट घेतला होता. मृतकावर वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला आहे. आनंद यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आई वडील असा आप्त परिवार आहे. 
Previous Post Next Post