कालू रामपुरे | सह्याद्री चौफेर
वरोरा : एअर बॉर्न ट्रेनिंग स्कुल,पैगाम साहित्य मंच, योगी अरविंद बहुद्देशीय संस्था व माजी सैनिक संघ वरोरा यांचा संयुक्त विद्यमाने भारतीय सैन्याची कारगिल युद्धात अदम्य पराक्रम गाजवून शस्त्र सैन्यास नामोहर करून विजश्री मिळविल्याबद्दल,भारतीय सौन्याने केलेल्या अदम्य पराक्रमाची गाथा नवींन पिढीला कळन्यासाठी तथा शहीद जवानाप्रती आदरांजली म्हणून आयोजित कारगिल विजय दिवस या समरोहात श्री.अहेतेशाम अली माजी नगराध्यक्ष-न.प.वरोरा तथा जिल्हा सचिव भाजपा यांच्याकडून शहीद विर जवानांना आदरांजली वाहिली गेली.या प्रसंगी सोबत असलेले सर्व माजी सैनीकांचे मनोबल वाढऊन "भारत माता की जय" "जय हिंद - जय भारत" असे नारे लावण्यात आले.
या प्रसंगी माजी सैनिक- सुरेश बोभाटे, वामन राजुरकर, सागर कोहळे, अनिल चौधरी, रवि तुराणकर, शेषराव कडूकर, निलेश पावडे, रुबेश्वर कुत्तरमारे, प्रवीन चिमुरकर या सर्व माजी सैनीकांसोबत सामाजिक कार्यकर्ते व मित्र परिवार यांची उपस्थिति होती..!