कॉल आला पोलीस गेले आणि त्याने दगडाने हल्ला चढविला

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर  

वणी : अत्यावश्यक सेवेसाठीच्या 112 या नंबर वर फोन करणाऱ्या एका युवकाने चक्क! पोलिसांवर दगडफेक केली, यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. व वाहणाचेही नुकसान झाले. ही घटना काल 21 जून च्या रात्री 11 वाजताच्या दरम्यान घडली.
गोकुळ नगरीतील एका 34 वर्षीय युवकाने घरात वाद करून 112 वर कॉल केला. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहचले, त्याची अवस्था पाहून पोलीस त्याला समजावू लागले असतांना युवकाने पोलिसांवर दगडाने हल्ला चढविला. यात निरंजन खिरटकर हा पोलीस कर्मचारी जखमी झाला. पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 
दरम्यान, आरोपी गजानन भगाडे (34) हा घटनास्थळावरून पसार झाला, त्याच वेळी पोलिसांनी शहर पिंजून काढले. मात्र, तो हाती लागला नाही. आज 22 जून रोजी त्याला दीपक टॉकीज परिसरातून अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास वणी पोलीस करित आहे.
Previous Post Next Post