Top News

माजी उप नगराध्यक्ष बाबाराव परचाके काळाच्या पडद्या आड

सह्याद्री | चौफेर न्यूज 

केळापूर : पांढरकवडा येथील माजी उप नगराध्यक्ष बाबाराव परचाके (गुरुजी) यांचे आज 21 जून रोजी रात्री 9 वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे 82 वर्षाचे वय होते. त्यांना दीर्घ काळापासून पोटाचा विकार असल्यामुळे त्यांचे वर यवतमाळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्यांनी अखेरचा या जगाचा निरोप घेतला. ते सर्वत्र परचाके गुरुजी म्हणून प्रसिद्ध होते.
येथील नप शाळेत शिक्षक म्हणून आणि मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी स्वतः ला समाजसेवेत झोकून दिले. ते सन 2007 ते 2012 या काळात पांढरकवडा नपचे सदस्य म्हणून निवडून आले होते. शेवट च्या वर्षात अडीच वर्षासाठी नप उप नगराध्यक्ष म्हणून ही त्यांनी काम पहिले.
त्यांच्या पश्चात पत्नी, इंजि. शैलेश, डॉ निलेश व रितेश (माजी सभापती नप पांढरकवडा) अशी तीन मुले व एक विवाहित मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्य यात्रा बुधवारला दुपारी 12 वाजता सरदार पटेल निवास्थान येथून निघेल असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
        जाहिरात साठी संपर्क करा : 9011152179
Previous Post Next Post