टॉप बातम्या

चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्पदंश झालेल्या मुलास याेग्य उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१२ ऑक्टो.) : जिल्ह्याच्या मूल तालुक्या अंतर्गत येत असलेल्या येरगाव येथील एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील 13 वर्षीय नामे ध्रुव संजय गळपल्लीवार यांस सर्पदंश झाला हाेता .त्यास चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यांत आले हाेते. रुग्णालयात योग्य उपचार वेळीच न मिळाल्याने तसेच शासकीय रुग्णालयातील कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याची दुखदायक घटना आज घडली. दरम्यान यंग चांदा ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या टीमने प्रत्यक्षात जाऊन रुग्णालयात भेट दिली.व झालेल्या संतापजनक प्रकरणाची सखोल चौकशी तसेच शासकीय रुग्णालयातील प्रत्येक कामचुकार कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा विजय foundation चे संचालक अजय दुर्गे यांनी केली.

या वेळी साहिल समुंद, प्रदीप दासरवार, चंद्रशेखर चिताडे, पवन वाकडे, सचिन महोरकर व यंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post