टॉप बातम्या

मुकुटबन : क्रेशरने घेतला चंद्रपूर जिल्ह्यातील मजुराचा बळी

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (३० ऑक्टो ) : तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खडकी (गणेशपूर) शेत शिवारात एका मजुराचा सोयाबीन काढत असतांना क्रेशर मध्ये पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुपारी 3 च्या दरम्यान घटना घडली.

मृतक विलास भूदाजी तोडासे (अंदाजे वय ५५) रा. भाटाडी जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहे. 
सध्या जिल्ह्यात मजुरांची कमतरता असल्याने बाहेरील जिल्ह्यातील मजूर कामाला येत आहे. कापूस वेचणी ला वेग आला असून समोर दिवाळी असल्याने शेतातील शेतकऱ्यांचे सोयाबीन मोठया क्रेशरने (हडंबा) काढून देण्याचे काम सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गँग मजुरीसाठी या परिसरात येऊन असून, त्या गँग मधील काही लोक खडकी येथील विठ्ठल ठावरी यांच्या शेतात क्रेशरने सोयाबीन काढण्याचे काम करीत होते. पुढे दीपावली असल्याने हे मजूर आज सर्व कामे आटोपून आपापल्या घरी जाण्याच्या तयारीत असतांना दि.३० ऑक्टोबर रोजी विलास तोडासे नामक व्यक्तीचा  सोयाबीन काढतांना अचानक तोल जाऊन क्रेशेरच्या पट्ट्यावर मजूर पडल्याने तो सरळ क्रेशेरच्या आतपर्यंत गेल्याने अर्धे शरीर छिंनविच्छिन्न झाले व त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघाताची माहिती खडकी,मुकुटबन,गणेशपूर व अडेगाव पर्यंत वाऱ्यासारखी पसरताच हजारो लोकांची गर्दी पाहण्याकरिता उसळली.
सदर घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते राजू लोंढे व पोलीस पाटील मंगेश बरडे हजर होते त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक राजू नेवारे व पोलीस नाईक संतोष मडावी घटनास्थळी पोहचले. पंचनामा सुरू होता. पंचनामा करून शव शविच्छेदन करिता झरी येथे पाठविण्यात येणार आहे. मात्र येत्या सणासुदीच्या पर्वावर तोडासे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले. 

 

 











Previous Post Next Post