टॉप बातम्या

त्याने, विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून केले शारीरिक शोषण, आरोपीस अटक

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (१८ ऑक्टो.) : शहरातील वार्ड क्रमांक ३ मध्ये राहणाऱ्या एका २८ वर्षांच्या विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून र्लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला मारेगाव पोलिसांनी अटक केली.

कुणाल दशरथ गोडे (२५) रा. अर्जुनी असे लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

"तीचे लग्न २०११ मध्ये झाले होते, ती आणि तिची मुलगी भाड्याच्या खोलीत राहतेय असे समजते."

विवाहित महिला आपल्या मुलीसोबत मारेगाव शहरातील वार्ड क्रमांक ३ मध्ये भाड्याने रूम करून राहतेय. कुणालची २०१६ मध्ये सदर विवाहित महिलेशी ओळख झाली. ती मुलीसोबत एकटी राहत असल्याचे समजल्यानंतर त्याने मैत्री वाढवण्यास सुरुवात केल्यानंतर त्याचे "या" ना "त्या" बहाण्याने घरी ये-जा सुरू झाले. अशातच त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तीने कुणालला लग्न करण्याची मागणी घातली; परंतु त्याने लग्नास साफ नकार देत पीडित महिलेच्या मुलीला व तीला मारून टाकण्याची धमकीच आरोपीने दिली. 

पीडितने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी कुणाल गोडे विरुद्ध लैंगिक अत्याचारासह अनुसूचित जाती- जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला पोलिसांनी अटक केली. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार व नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली इकबाल शेख, आनंद अचलेवर, अजय वाभीटकर, रजनीकांत पाटील हे पुढील तपास करित आहे.
Previous Post Next Post