टॉप बातम्या

पाटण (बोरी) येथील भूमिपुत्र कार्तिक कायतवार यांचे जंगी स्वागत

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (२३ सप्टें.) :  पाटण (बोरी) येथील भूमिपुत्र  कार्तिक सतीश कायतवार यांची भारतीय सेनेत निवड झाल्यानंतर प्रथमच त्याचे पाटण आगमनानिमित्त नॅशनल हायवे ४४ पासून महिला व पुरुषांनी स्वागत करत पाटण (बोरी) येथे जंगी आगमनात सहभागी होऊन त्यांचे स्वागत केले.

कार्तिक कायतवार हा पाटण बोरी येथील एका गरीब कुटुंबातील विद्यार्थी असून, त्याची भारतीय सैन्य सेवेत रुजू झाल्यानंतर शहरात त्यांचे आगमन झाले. या प्रसंगी गावातील नागरिक, महिला पुरुषांनी त्याचं गावाचा  भूमिपुत्र सैन्यात भरती झाला हा अभिमान आम्हाला म्हणून स्वागत करत त्यांच्या घरी घेऊन आले.

वडीलांचे छत्रछाया हरवलेल्या कार्तिकला आईने काबाड कष्ट करून त्याला शिकवलं, त्याच मेहनतीचं फलित झाले असून त्याची आज भारतीय सैन्यात त्यांची निवड झाल्याबद्दल पाटण (बोरी) मध्ये कार्तिक यांचे  जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी असंख्य नागरिकांच्या उपस्थित त्यांचे अभिनंदन व परिवाराची स्तुती करण्यात येत आहे.
Previous Post Next Post