Page

गजाननभाऊ बेजंकीवार यांच्या प्रयत्नातून साकारणार पाटणबोरी येथे जिल्हा परिषद चे शाॅपिंग काॅमप्लेस

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवडा, (२४ सप्टें.) : पाटणबोरी येथील मूख्य रस्तावर जूना ग्रामपंचायत चौकात जिल्हा परिषद शाळेच्या मूख्याधपकाचे निवासस्थान होते. परंतू मागील १० ते १५ वर्षापासून कोणीच तिथे राहत नसल्यामूळे ईमारत अतिशय जिर्ण अवस्थेत होती, सदर जागा जिल्हा परिषद ची असल्याणे तिथे दुकान गाळे काढण्यासाठी गजानन बेजंकीवार जिल्हा परिषद सदस्य यांनी आग्रहाची भूमिका घेतली व जिल्हा परिषद च्या शेष निधीतून अठरा लक्ष रूपये मंजूर करून घेतले त्यांतून दोन दुकान गाळे व वरच्या मजल्यावर मोठा हाॅल मंजूर करून घेतले. सदर दुकान गाळे मूळे जिल्हा परिषद चे उत्पन्नात वाढ होईल व पाटणबोरी येथील नागरीक सुविधा उपलब्ध होईल असे गजाननभाऊ बेजंकीवार यांनी सांगितले तसेच लवकरच कामही सुरू करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद यवतमाळ चे पांढरकवडा तालुक्यात प्रथमच दुकान गाळे पाटणबोरी येथे होत असून त्यामूळे गावाच्या सौंदर्यात भर पडणार असून या आदी गजानन बेजंकीवार यांनी प्राथमीक आरोग्य केंद्र 6.50 कोटी व कालीका माता मंदीर येथे भव्य असे सभागृह 30 लक्ष चे कामे मंजूर करून घेतले व ती कामे प्रगतीत आहे. कालीका माता मंदीर परिसर विकास साठी सूध्दा 16 लक्ष निधी मंजूर करून घेतले आहे त्यातून कंम्पाऊण्ड वाॅल चे बांधकाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.