२१ वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या


सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (०१ सप्टें.) : शहरातील खांजी वार्ड येथील एका २१ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार दि.०१ संप्टें. ला सव्वा बाराच्या वाजताच्या सुमारास उघडीस आली.

मोना हरिदयाल चव्हाण (२१) असे युवतीचे नाव आहे. ती खांजी वार्ड वरोरा येथील रहिवाशी असून आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.

प्राप्त माहितीनुसार मोनाचे आई वडील घर च्या शेतातील कामासाठी गेले होते. घरी मोठा भाऊ व वहिनी होते, परंतु ते शेजारच्या घरी बसले होते. मोना आपल्या घरी एकटीच होती, घरी कोणी नसल्याने तीने गळफास घेतला असे माहिती समोर आली आहे. मात्र, आत्महत्याचे दिवशी सकाळी मोनाने एक चिट्ठी लिहिली होती. त्यामध्ये असे लिहिलेले की, आईबाबा, भाऊ बहिणींना मला माफ करा मी आत्महत्या करीत आहे. आईबाबा तुम्ही खूप चांगले आहात, मला पुढच्या जन्मी तुमच्यासारखे आईवडील मिळावे असे चिट्ठीत नमूद केले असून, माझ्या आत्महत्येला कोणी जबाबदार नाही. मी स्वतः जबाबदार आहे. 

अखेर तीने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृत्यूदेह शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.


"विशेष उल्लेखनीय की, मोनाचे पंधरा दिवसा अगोदर सगाई झाली होती. आईवडीलांनी तिच्या इच्छेनुसार मुलगा बघून साक्षगंध केले. ती  खुश होती तरी सुद्धा तीने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अजूनही कळलेले नाही." 
Previous Post Next Post