सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (२९ ऑगस्ट) : तहसील कार्यालय महागाव यांचे वतीने आदरणीय स्वप्नील कापडणीस उपविभागीय अधिकारी उमरखेड तसेच श्री एन.जे. इसलकर तहसीलदार महागाव व इतर कर्मचारी यांना निरोप देण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी देऊळगावकर सर प्रभारी उपविभागीय अधिकारी उमरखेड तथा तहसीलदार उमरखेड अध्यक्षस्थानी होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विश्वंबर राणे साहेब, डॉ. संतोष आदमूलवाड, सौ. माया ठोके मॅडम मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम स्वप्नील कापडणीस उपविभागीय अधिकारी यांचा सन्मान शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.तसेच एन जे इसलकर तहसीलदार महागाव यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इतर कर्मचारी श्री पाईकराव, भडंगे, पांडे, अश्विनी फाटे, पुरी मंडळ अधिकारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
उपविभागीय अधिकारी देऊळगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की इसलकर साहेब यांनी तहसीलदार पदाचा प्रभार हा उत्तम रित्या सांभाळला. इसलकर साहेब यांनी कर्मचाऱ्यांना व येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपुलकीची वागणूक देऊन सर्व सामान्य जेनतेचे कामे केली व तसेच उपविभागीय अधिकारी कापडणीस साहेब यांचा कार्यकाळ सुद्धा चांगल्या प्रकारे गेला सदर कार्यक्रमाला सर्व कर्मचारी अधिकारी हजर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर एस. एस. अदमूलवाड नायब तहसीलदार यांनी केले तसेच सूत्रसंचालन शंकर चव्हाण व आभार प्रदर्शन राजू वैद्य यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व अधिकारी, कर्मचारी, मंडळअधिकारी, तलाठी, शिपाई व कोतवाल यांनी सहकार्य केले.