टॉप बातम्या

म्हैसदोडका येथील तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (३१ ऑगस्ट) : म्हैसदोडका येथील तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. सुरेश विठ्ठल घागी (२८) रा. म्हैसदोडका असे विष प्राशन करून आपले जीवन संपवलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

आज ३१ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी १२:३० वाजता च्या दरम्यान स्वतः च्या शेतामध्ये विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच त्याला मारेगांव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. सुरज हा अविवाहित असून, त्याच्याकडे सुमारे सहा एकर शेती आहे. मात्र,त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

विशेष उल्लेखनीय की, मारेगाव तालुक्यात आत्महत्या चे सत्र सुरूच आहे. दर आठवड्यात सुमारे एक दोन आत्महत्या होत आहे. प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. 
Previous Post Next Post