टॉप बातम्या

कलाकारांचे ९ ऑगस्ट ला राज्यव्यापी आंदोलन

                       (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे 
पुणे, (२९ जुलै) : कलाकारांना कला सादर करण्याची परवानगी मिळावी, चित्रीकरणास परवानगी मिळावी,नाट्य गृहे सुरु करावीत आणि कलाकारांना रंगकर्मी रोजगार हमी योजना लागू करावी,अशा विविध मागण्यासाठी रंगकर्मी राज्यभर आंदोलन. करणार आहेत. ९ ऑगस्ट ला प्रत्येक जिल्ह्यात एकाच वेळी हे आंदोलन होणार असून, त्यात मालिका चित्रपट,नाटक क्षेत्रातील कलाकारांसह लोककलावंत सहभागी होणार आहेत. कलाकारांच्या व्यथेकडे सरकार चे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. बुधवारी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कलाकारांना आपल्या व्यथा मांडल्या, पुण्यात जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर दुपारी १२ वाजता हे आंदोलन होणार असून, प्रत्येक जिल्ह्यात सरकार च्या नियमांप्रमाणे ५० जणांच्या उपस्थितीत आंदोलन होणार असल्याचे कलाकार जयराज मोरे यांनी सांगितले. 
Previous Post Next Post