सह्याद्री न्यूज नेटवर्क |
वणी, (५ जुलै) : तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. नागरिकांच्या संयमाचा बांध कधीही फुटू शकतो. पुरड ते वेळाबाई हा मार्ग खड्डयांनी व्यापला आहे. वारंवार दिलेल्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्याऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जागे करण्यासाठी भाजयुमोचे पदाधिकारी शुभम गोरे यांच्या नेतृत्वात रस्त्यावरील खड्ड्यात बसून अभिनव आंदोलन केले.
शासन धनदांडग्याच्या दावणीला बांधल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. पुरड ते वेळाबाई हा मार्ग चक्क यम सदनाचा दरवाजा ठोठावतोय. यामुळे प्रशासनाची कार्यप्रणाली चव्हाट्यावर येत आहे. याप्रसंगी भाजयुमो तालुका अध्यक्ष शुभम गोरे, सरपंच विजय ठावरी, भाजयुमो पं.स सर्कल प्रमुख निलेश उराडे, वसंता भोस्कर, विकास आसुटकर, भालचंद्र नैताम, सुनील पिदुरकर, विठ्ठल गोरे, अविनाश गेडाम व गावातील नागरिक उपस्थित होते.