सह्याद्री न्यूज न्यूज :
आर्णी, (६ जुलै) : आर्णी पोलिस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांची आज दिनांक ५ जुलै अचानक बदली झाली आहे.
त्यामूळे शहरात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
पितांबर जाधव हे आर्णी ला रुजु झाल्या, बरोबर आर्णी शहराला कलंक असलेले प्रेम नगर त्यांनी खाली केले. असे अनेक कार्य त्यांनी केले असुन, आज अचानक त्यांची बदली झाल्याने परत प्रेम नगर जैसे होणार कल व माफिया राज येणार का?
असे अनेक प्रश्न उपस्थीत झाले आहे.
तसेच तालुक्यातील जनता कर्तव्यदक्ष अधीका-याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरेल का? हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.