टॉप बातम्या

कोतवाल संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (ता.२६) : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेची जिल्हा अध्यक्ष शशिकांत निमसटकर यांनी नुकतीच जाहीर केली. २२ जून रोजी यवतमाळ येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते. 
यावेळी या नेमणूका करतांना विभागीय समतोल साधत नेमणुका करण्यात आल्या.

यावेळी अध्यक्ष शशिकांत निमसटकर यांनी यवतमाळ येथील मंगेश ढकळे यांची कार्याध्यक्ष म्हणून महागाव येथील सुदर्शन गोस्वामी यांची जिल्हा उपाध्यक्ष राळेगाव येथील उमेश चांदेकर सहसचिव, दारव्हा येथील प्रशांत प्रभाते कोषाध्यक्ष, केळापूर येथील राहुल काळे संघटक तर, पुसद येथील श्रीमती शारदा गायमुखे, अमरावती विभागाच्या विभागीय महिला संघटक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली .
महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून राळेगाव येथील छाया दरोडे आणि संगीता काळे तसेच रविना धुळध्वज यांची जिल्हा महिला संघटक म्हणून नेमणूक करण्यात आली.
Previous Post Next Post