सह्याद्री चौफेर | योगेश मडावी
झरी-जामणी : तालुक्यातील पाटणबोरी येथील रहिवासी राहुल अशोक बोगावार (वय ३०) यांचा गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राहुल बोगावार हे झरी-जामणी येथे इलेक्ट्रॉनिक व मोबाईल दुरुस्ती तसेच विक्रीचा व्यवसाय करीत होते. गुरुवारी रात्री सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास माथार्जुन–बोरी मार्गावर, अंदाजे ९०० मीटर अंतरावर त्यांच्या दुचाकीला (क्रमांक MH 29 CH 6662) अपघात झाला.
या अपघातात राहुल बोगावार यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमलदार रितेश वानखेडे ,सचिन गाडगे, हेमंत कामतवार, अरविंद जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी झरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.