सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : ‘मात्र’ ॲप्लिकेशनमध्ये 100 टक्के कुटुंब नोंदणी पूर्ण केल्याबद्दल टाकरखेडा येथील आशा स्वयंसेविका गीता संजय जीवने (उपकेंद्र करणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र वेगाव, ता. मारेगाव) यांचा गौरव करण्यात आला.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मडावी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे आरोग्य विभागाच्या उपक्रमास चालना मिळाली आहे.
