वणी-यवतमाळ जिल्हा प्रभारी पदी प्रतीक गौरकार यांची निवड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : सनातन रक्षा दल संघटनेच्या वणी यवतमाळ जिल्हा प्रभारी पदी येथील प्रतीक गौरकार यांची निवड करण्यात आली आहे. वणी येथील शासकीय विश्रामगृह येथे आज (20 जुलै) संघटनेची आढावा बैठक पार पडली. त्या बैठकीत त्यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिवाकर साखरकर यांच्या हस्ते, वसंतराव बडनेकर, आभाताई पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली  संपर्क प्रमुख आनंद पिंपळकर यांच्या नेतृत्वात नियुक्ती पत्र देऊन वणी यवतमाळ जिल्हा प्रभारी पदाची जबाबदारी दिली. बैठकीला उपस्थित सर्व मान्यवरांनी नवनियुक्त जिल्हा प्रभारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रथम झाडे,यश पानघाटे, तन्मय मोरे, विशाल राऊत, जय बोढाले, गौरव नागतुरे, यश डाखरे, कार्तिक वनकर, विक्रांत बदकी, नरेश ठाकरे यासह वणी मारेगाव वा झरी विभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

सनातन धर्माचे रक्षण करणे, हिंदू संस्कृतीचे संवर्धन करणे, भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन देणे. आणि मानव हिताचे संरक्षण. हाच एकमेव उद्देश ठेवून संघटनेचे कार्य कसे वाढवता येईल यासाठी प्रतीक गौरकार यांची यवतमाळ जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. असे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिवाकर साखरकर यांनी 'सह्याद्री चौफेर'शी बोलताना यावेळी सांगितले. 
Previous Post Next Post