सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव शहरासह तालुक्यातील रुग्णांसाठी या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ज्यामध्ये दक्षता विभाग फ्युजन पंप, अत्याधुनिक व्हेंटिलेटर, एक्स-रे सुविधा, कॉम्पुटर इसीजी, मल्टीपॅरामिटर्स, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टम, सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टम, मेडिकल नर्सिंग होम, पॅथॉलॉजी लॅब, एसी डिलक्स रूम, सेमी डिलक्स रूम यासह विविध सुविधेची उपलब्धी मिळणार आहे, असे डॉ महेंद्र लोढा यांनी सांगितले.
या इमारतीची रचना सुसज्ज अत्याधुनिक प्रतिरोधक असून यवतमाळ (रोड) राज्यमहामार्गांवर बांधण्यात आले आहे. या लोढा हॉस्पिटल मध्ये जनरल फिजिशियन,प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ, मधुमेह व हृदयरोग तज्ञ, अस्थीरोग तज्ञ्, बालरोग तज्ञ्, नेत्ररोग तज्ञ्, दंतरोग तज्ञ्, असे आठ आरोग्य तज्ञ् काम करणार असून आवश्यकतेनुसार वातानुकूलित यंत्रणेची तरतूद आहे जेणेकरुन रुग्णांवर उपचार करणे शक्य होईल.
या प्रसंगी वणी उपविभागीय क्षेत्रातील सर्व पक्षातील राजकीय, सामाजिक, बिजनेस मॅन, नेते, पुढारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील महिला वर्ग, पुरोगामी प्रगतशील शेतकरी, शेतमजूर या सर्वांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली होती.