Page

मार्डी ते नांदेपेरा रस्त्याची दुरावस्था


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वणी ते मार्डी या राज्यमार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून ठिकठिकाणी रस्ता उखडला आहे. ह्याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे,असे परिसरातील नागरिकांचे म्हणणं आहे.

मागील वर्षभऱ्यात मार्डी, मच्छिन्द्रा, वनोजा देवी रस्ता हा नवीन तयार करण्यात आला होता. मात्र, काही महिन्यातच ह्या रस्त्याची खराबस्थिती पाहायला मिळाली होती. प्रवाश्यांसह नागरिकांची ओरड होताच नांदेपेरा ते वनोजा देवी व मच्छिन्द्रा ह्या रस्त्याची डागडुग्गी केली. सदर मार्गाने वाहने धावत होती. आजही वाहतूक सुरू आहेत परंतु आता पुन्हा जड व भरधाव वाहतुकीने ह्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहे. 
त्यामुळे वारंवार हा रस्ता उखाडणे, भेगा जाने, रस्ता दबणे व अधून मधून डागडुग्गी करणे म्हणजे हा रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे कि काय असा आपसूकच प्रश्न निर्माण होतोय. तसेच या मार्गाने जड वाहतुकीला मज्जाव असताना सुद्धा काही वाहनचालक मार्डी नांदेपेरा मार्गाने जड वाहतूक करताना दिसून येतात. शासनाच्या आदेशाला वाहनधारकाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. त्या मुळे या रस्त्याची दुरावस्था होत असल्याचे बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे वाळू ट्रक, टिप्पर सुसाट या रस्त्याने धावताना दिसतात. कित्येकदा ट्रक रस्त्याच्या कडेला उभे करून टाईमपास करतात. वेळ झाली कि, सायंकाळच्या वेळी हे ट्रक सैराट झाल्यासारखे मार्डी, वनोजा देवी तर,कधी लाखापूर व नांदेपेरा ह्या मार्गाने भरधाव पळवतात. अशा वाहनावर संबंधित विभागाने लक्ष केंद्रित करणं तूर्तास गरजेचे आहे. 
मार्डी ते नांदेपेरा मार्गे अनेक प्रकारची जड वाहने एकामागे एक जसे सुसाट धावतात. या मुळे वेगवान स्पर्धेत कित्येक किरकोळ अपघात 'फिस्की'च्या जंगलात घडले. विशेष म्हणजे रात्रभर "भुरभर" त्रास राहिला एकीकडे, पोलिसांचा ससेमीरा नकोत म्हणून अनेकजण चूप आहे. पणमात्र नागरिकात या बेभान धावणाऱ्या व चांगल्या रस्त्याची वाट लावणाऱ्या वाहनाबाबत रोष व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी, पोलीस वाहतूक अधिकारी, कोणीही या भरधाव वाहनाकडे लक्ष घालताना दिसत नसल्यामुळे सदर मच्छिन्द्रा, वनोजा देवी व लाखापूर रस्त्याची दुरावस्था झाली असल्याची ओरड परिसरातील नागरिकांतून होताना दिसत आहे.