Page

गजानन येरकाडे यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड

सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख 

कळंब : कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन येरकाडे यांची सन्मान पार्टी यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना सन्मान पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.हिरालाल गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल सन्मान पक्षाचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष प्रा हिरालाल गायकवाड, महासचिव जंगलु ओंकार, कोषाध्यक्ष वासुदेव खेरडे, बळीराम राठोड, पांडुरंगजी मेहरे ,विदर्भ प्रमूख विकास लसवंते इत्यादी पदाधिकाऱ्यांचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष गजानन येरकाडे यांनी आभार व्यक्त केले.

पक्षाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही तसेच सन्मान पक्षाच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकाला न्याय देण्याचा मी सदैव प्रामाणिक प्रयत्न करेन अशी गवाही नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष गजानन येरकाडे यांनी आमचे प्रतिनिधी रुस्तम शेख यांच्या कडे व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल जिल्हा उपाध्यक्ष नामदेवराव आत्राम, शेखर निखाडे ,हरीश बोंदरे , रुत्तम शेख तसेच मित्र परिवाराने अभिनंदन व्यक्त केले.