Page

तब्बल 31 वर्षानी झाली वर्ग मित्राची भेट


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सन 1993 च्या मॅट्रिक वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीने गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वनोजा देवी येथे आयोजित या कार्यक्रमात तत्कालीन शिक्षकानी उपस्थिती दर्शविली होती.पंचशिल हायस्कूल नांदेपेरा येथे सन 1993 च्या वर्षाला म्याट्रीक मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या वनोजा देवी येथील सभामंडपात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक सुरशे होते.तर तत्कालीन शिक्षक बेलेकर, आसुटकर, कालेकर विध्यमान मुख्याध्यापक क्षिरसागर, प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान च्या काळात कोरोना सह ईतर आजारात दगावलेल्या माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी आपला परीचय देवुन सध्या करीत असलेल्या कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली. तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपले या बॅच बद्दल अनुभव विषद केले.भजन, डान्स, गीतगायन करुन कार्यक्रमाची सांगता झाली.सूत्रसंचालन तथा आभार छाया उईके यांनी केले प्रास्ताविक हरी आसूटकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय चहानकर, कवडू माथनकर किशोर हेपट, विजय शेडामे, शरद धोपटे, मधुकर वैद्य, अनिल मत्ते, प्रतिभा भंडारी, भाग्यश्री कालेकर, वैशाली चिकटे, अर्चना मत्ते, वंदना रणदिवे, कल्पना खामनकर, विद्या सुरशे, अनिता आसुटकर, इंदिरा शेळकी यांनी प्रयत्न केले.