यवतमाळ सत्ता | वृत्तसंस्था
मारेगाव : जय जगन्नाथ बाबा वृद्धाश्रम वडगाव (टीप) येथे वास्तव्यात असलेल्या निराधार वृद्धासोबत महिला पत्रकार प्रतिभा तातेड यांनी आपला वाढदिवस साजरा केला आहे.
या निमीत्ताने येथील वृद्धाना फळ वाटप करण्यात येऊन वृद्धाश्रमाला वृक्ष लागवड साठी झाड सप्रेम भेट देण्यात आले आहे.प्रेस सपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य तालुका शाखा मारेगावच्या वतीने या महिला पत्रकारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गोवर्धन व तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम यांचे अध्यक्षते खालील आयोजित या कार्यक्रमात अनेक पत्रकारानी सहभाग नोंदवला होता.
येथे वास्तव्यात असलेल्या निराधार वृद्धाच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी हितगुज केली.यावेळी पत्रकार तातेड यांचा या ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.या अभिनव उपक्रमाचे तालुक्यात कौतुक होत आहे. सामाजिक दायित्वाचा संदेश पोहचविण्याच्या हेतूने दरवर्षी या वृद्धाश्रमात विविध उपक्रम राबवून संकल्प करण्यात आला आहे. पत्रकार राजूभाऊ तुराणकर यांनी हा कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे विचार व्यक्त केले. यावेळी जेष्ठ पत्रकार माणिक कांबळे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुमार अमोल, आनंद नक्षणे, पंकज नेहारे,यांचेसह अनेकानी प्रयत्न केले.