Page

आणखी एका शेतकरी पुत्राने घेतला जगाचा निरोप

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : तालुक्यात सतत आत्महत्याच्या घटना घडत आहे. हि आत्महत्येची धग कायम असताना आणखी एका शेतकरी पुत्राने (ता.17) डिसेंबर रोजी राहत्या घरी विष प्राशन केले होते. मात्र, आज मध्यरात्री त्याची प्राणजोत मालवली. त्याच्या अशा अकाली निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

महेश मारोती ढोके (31) रा.शिवणी (धोबे) असे निधन झालेल्या अविवाहित तरुणाचे नाव आहे. महेशने आठ दिवसापूर्वी आपल्या राहत्या घरी घरात कोणीच नसतांना सायंकाळी 6 वाजता विषारी द्रव्य प्राशन केले होते, हि दुःखदायक बाब घरच्यांना निदर्शनास येताच त्याला तातडीने आधी वणी येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला चंद्रपूर येथे शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. महेश याच्यावर मागील आठ दिवसापासून उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा काल रविवारच्या मध्यरात्री 1 वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती आहे. वडिलांच्या शेत कामात हातभार लावणारा महेश त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप ही अस्पष्ट आहे. मात्र तालुक्यात सतत होणाऱ्या आत्महत्येच्या घटनेत वाढता आलेख पाहता चिंता व्यक्त केली जात आहे.

महेश यांच्या पश्चात आई वडील, एक भाऊ, दोन विवाहित बहिणी असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्याची मृत्यूशी झुंज संपताच ढोके परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले असून शिवणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.