सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मारेगाव तालुक्यातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. लाखापूर (आकापूर) रस्त्यावर दगड गिट्टी निघाल्याने रस्त्यावर दगडांच्या खच पडला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना जाणे येणे कठीण झाले आहे.
लाखापूरहून भांदेवाडा, तर देवी (मंदिर जनामाय कासामाय) या रस्त्याला जोडणारे गावे बहुतांश गावे असून त्या गावातील विद्यार्थी शेतकरी तसेच अनेक नागरिक नेहमीच त्यांना तालुक्याच्या ठिकाणी यावे लागतात. परंतू या भयावह रस्त्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. कधी दुचाकी पंक्चर होऊन धक्का मारत न्यावी लागेल याचा नेम नाही. या मार्गाचे गेल्या अनेक वर्षांपासून डागडुजी नसल्याने रस्त्याची संपूर्ण वाट लागली आहे.
मारेगाव वरून हे संपूर्ण क्षेत्र वीस ते तीस किलोमीटर आहे. विशेष उल्लेखनीय की, वनोजा देवी वरून लाखापूर मार्गे तीर्थक्षेत्र भांदेवाडा येथे दर 16 तारखेला हजारोंच्या संख्येने भाविक जातात येतात. त्यामुळे हा रस्ता होणे अपेक्षित असल्याचे या मार्गाने जाणारे भाविक सांगतात. तूर्तास या रस्त्याची दयनीय अस्वस्था झाल्याने किरकोळ अपघातही घडले आहेत. या गंभीर बाबीकडे आजपर्यंत कोणत्याही पुढाऱ्यांनी ढुंकूनही पाहिले नाही ही शोकांतिका आहे.
रस्ता व्हावा हे सर्वांना वाटते. परंतु प्रयत्न कोणीच करताना दिसत नसल्याने लाखापूर येथील उपसरपंच सौ शोभा योगीराज बलकी यांच्या सह गावकरी, गुरुदेव भजन मंडळाचे सदस्य भांदेवाडा, लाखापूर ते देवी डांबरीकरण करण्यात यावे, यासाठी संबंधित प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचे माहिती आहे. आता हा मार्ग कधी निर्माण केल्या जाते, याकडे ग्रामावासियांचे लक्ष लागले आहे.