टॉप बातम्या

अवकाळी पावसाची दोन दिवसापासून रिपरिप, तूर,कपाशी पिके धोक्यात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले असून कालपासून मारेगाव तालुक्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची रिपरिप सुरु आहे.

शनिवारी राज्यातील 25 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून यवतमाळ जिल्ह्याला 'यलो अलर्ट' दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यात मोठ्या पावसाचे वातावरण निर्माण झाले असून काल सोमवार आणि आज मंगळवार सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु झाली आहेत.

या पावसामुळे चना,गहू या पिकांना फायदा होत असला तरी तूर,कपाशी पिके धोक्यात आली असून किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाले, परिणामी कापसाला भाव नाही, व अस्मानी संकट जगू देत नसल्यामुळे शेतकरी राजा या अवकाळी पावसामुळे हवालदिल झाला आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();