देशात रोज माझ्या मरतो किसान....



             देशात रोज माझ्या मरतो किसान...

झाड मोठ झालं की, त्या पान फुटणाऱ्या झाडाला
फांद्या म्हणतात,
माझ्या बापाच्या आर्थिक वातबंडीच्या कामाला नोटबंदी म्हणतात...

शेतकऱ्याला लाईट बिल भरायला लागतो खर्च,
घरात लाईट जरी लागत असेल तरी त्याला पैसे देऊनच करावा लागतो अर्ज....

काळया मातीतून कोंब फुटला त्याला डौलदार पीक म्हणतात,
आणि आज दोन वेळच पोटही भरू शकत नाही,
त्या माझ्या बापाला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात....

नांगरणी पेरणी किती खुशिने करतो,
बीज वर येई पर्यंत वाट बघतो,
पण देशात माझ्या रोज शेतकरीच का बरं मरतो,
तो आत्माहत्या का बर करतो....

Previous Post Next Post