सह्याद्री चौफेर | न्यूज
मारेगाव : मार्डी, नांदेपेरा राज्यमार्ग मागील सहा ते सात महिण्या अगोदर हा रस्ता नव्याने बांधण्यात आला. टकाटक रस्ता म्हणून यामार्गाने आता वाहतूक मोठ्या प्रमाणात दळण वळण होत आहे. परंतु मच्छिन्द्रा, देवी नांदेपेरा मार्गांवर जागोजागी खड्डे पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तसेच मजरा ते वांजरी या रस्त्यावर ही रस्त्याची वाट लागली आहेत.
सध्या पावसाचे दिवस आहे. रस्त्यावर खड्डा असणे हे जीवितास कधीही धोका ठरू शकतो, सदर मार्गाने प्रवास रात्री बेरात्री प्रवाश्यांचा सुरु असतात जर एखादी खड्डा लक्षात आला नाही तर जीव गमावल्या शिवाय पर्याय नाही त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते धनंजय आसुटकर यांनी संबंधित विभागाला या रस्त्यावरील पडलेले खड्डे तात्काळ बुजावण्यात यावे अशी मागणी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.