मारेगाव : तालुक्यात सध्या सहकार क्षेत्राचा "धुरळा" सुरु आहे. यामुळे मार्डी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था च्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले असतांना भाजप समर्थित नवपरिवर्तन पॅनलचा दारुण पराभव झाला असून, काँग्रेस शिवसेना समर्थित शेतकरी विकास पॅनलने विजय प्राप्त करीत सर्व 13 ही जागेवर आपला ताबा मिळविला आहे.
९ मे रोजी पार पडलेल्या मार्डी सोसायटी निवडणुकीत काँग्रेस शिवसेना समर्थित शेतकरी विकास पॅनलने सर्व १३ ही जागेवर यश संपादन करित दणदणीत विजय मिळविला.
विजयी उमेदवारांमध्ये कांग्रेस शिवसेना समर्थित शेतकरी पॅनलच्या वतीने सौ अरुणा खंडाळकर, नरेंद्र पा. ठाकरे, शिवसेना तालुका प्रमुख संजय आवारी, शिवसेनेचे उपविभागप्रमुख मोहन जोगी यांचे नेतृत्वात लढलेल्या या सोसायटी निवडणुकीत वसंत श्रीरंग आसुटकर, सुरेश पुरुषोत्तम चांगले, गोविंदा रामचंद्र देऊळकर, श्रावण गोसावी करडे, मोरेश्वर जगन्नाथ काकडे, मुकुंद रामभाऊ निवल, माणिक लक्ष्मण पांगुळ, रामचंद्र दादाजी थेरे तर इतर मागास वर्गीय गटातून अजय नारायण आसुटकर, अनुसूचित जाती गटातून रविराज परशराम चंदनखेडे, विमुक्त जाती व भटक्या जमाती गटातून नानाजी चंटी आस्कर, महिला राखीव गटातून प्रेमीला नानाजी आसेकर, बेबी वामन बोकडे हे निवडून आले आहेत. या निवडणुकीत १२ गावातील ६८२ मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला.