Page

अतुल म्हात्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : शांताई कॉम्पुटर सिस्टीमचे संचालक अतुल म्हात्रे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना रात्री साडे अकराच्या सुमारास उघडीस आली आहे.
अतुल म्हात्रे यांचे मृत्यू समयी ३० वर्षाचे वय होते. त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
 
शहरातील आंबेडकर चौक येथील शांताई कॉम्पुटर सिस्टीम चे संचालक अतुल अनिल म्हात्रे रा. छोरिया ले आऊट, गणेशपूर याला हृदयाचा त्रास सुरु झाला. उपचारासाठी अतुल खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अतुल यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व लहान बाळ असा आप्त परिवार आहे.