सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३० ऑगस्ट) : देशाच्या राजकारणात काँग्रेस—भाजपाला पर्याय म्हणून, अरविंद केजरीवाल यांचे नेतृत्वातील आम आदमी पार्टी फार वेगाने या जिल्ह्यात वाढत आहे. दरम्यान,काल रविवारी चंद्रपूर विधानसभेतील नकोड्याच्या शेकडो युवकांनी गणपती गेडाम यांचे नेतृत्वात आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला.
दिल्लीतील सुशासन, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, नेत्यांना मिळत असलेल्या मोफत वीज, पाणी, उत्तम आरोग्य आणि शिक्षण हे सामान्य माणसाला देवूनही देशातील नफ्यातील दिल्ली हे एकमेव राज्य असल्यांचे केंद्र सरकारच्या कॅगच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. असे मत सुनील मुसळे यांनी व्यक्त केले. दिल्लीतील सामान्य माणसाचे सरकार, चंद्रपूर जिल्ह्यात विवीध निवडणुकीच्या माध्यमांतून आणण्याचा संकल्प आम आदमी पार्टी जिल्हा कमीटीने केला असून, या दृष्टीने आपचे कार्यकर्ते दिवस रात्र परिश्रम घेत आहे. मागील काही वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पार्टीने सामान्य नागरिकांसाठी केलेले काम, कोरोणा काळात सामान्य रुग्णांना दिलेला दिलासा यामुळे आम आदमी पार्टीवर चंद्रपूर जिल्ह्यातील जनता विश्वास ठेवतील असा आशावाद मुसळे यांनी एका प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे.
ज्यावेळी काँग्रेस सत्तेत होती, त्यावेळचा भ्रष्टाचार, भाजपावाले बाहेर काढून 'ईडी, सिबीआय' लावतील अशी त्यांना भिती आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचे भविष्य भाजपा—काँग्रेस च्या हातात सुरक्षित नसून, हे दोनही पक्ष एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत.
या परिस्थितीत जनतेला स्वच्छ आणि चांगला राजकीय पर्याय आम आदमी पार्टीच असल्याची खात्री पटत असल्याने, मोठया प्रमाणावर नागरिक आम आदमी पार्टीत प्रवेश करीत आहे. काल प्रवेश करणाऱ्या मध्ये अविनाश भारशंकर, गणेश बावणे, अरुण उमरे, महेश हंसकार, राजू आसपवार, बळेश्वर साहू, शुभम सुबे, प्रेमदास सोयाम, महादेव गेडाम, मनोज दुबे, गणेश देशकर, गंगाधर मांदाडे कवडु नवले यांचेसह शेकडो युवकांचा समावेश आहे.
आगामी मनपा, नगर परिषद व इत्तर होणाऱ्या सर्व निवडणूका आम आदमी पार्टी लढविणार असून राजकीय कार्यकर्त्यानी व नागरीकांनी आम आदमी पार्टीत सहभागी व्हावे असे आवाहन आप कडुन यावेळी करण्यात आले.
नकाेडा येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमाला आपचे जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे, मयूर राईकवार ,संतोष दोरखंडे, अशोक आनंदे ,अमित बोरकर, सोनू शेत्तियार, धनराज भोंगले, सागर बि-हाडे, विकास खाडे, आशीष पाझारे आदीं उपस्थित होते.