सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी प्रेस वेल्फेअर असोसिएशन वणी तर्फे आयोजित आंतर शालेय नृत्य स्पर्धेत पूर्व माध्यमिक गट यामध्ये तृतीय क्रमांक पटकावला. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत ही स्पर्धा एस पी एम शाळेत आयोजित करण्यात आला होती.
विद्यार्थ्यांचा या यशाबद्दल संस्थेचे सचिव मा.श्री. ओमप्रकाशजी चचडा, संचालक मंडळ सदस्य श्री. विक्रांतजी चचडा, शाळेचे प्राचार्य श्री. प्रफुल महारतळे व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये सौ.शुभांगी बलकी, सौ. वंदना बाविस्कर, सौ.अर्चना पाटील, सौ. प्रणोती खडसे, सौ. रुपाली शिरपुरकर, कु. तेजस्विनी झाडे, सौ. संतोषी ताजणे इत्यादी शिक्षकांचा व विद्यार्थांच्या पालकांचा मोलाचा वाटा आहे.
आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 28, 2025
Rating: