सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार
पांढरकवडा : येथील ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. अमरावती लाचलुचपत विभागानं ही कारवाई केली आहे. पाच हजार रुपयाची लाच घेताना अमरावती लाच लुचपत विभागाकडून पांढरकवडा पो. स्टे.सहाय्यक पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन पांढरकवडा च्या बाजुला वसंतराव नाईक चौक, पांढरकवाडा येथे कारवाई कारण्यात आली.
दिनांक ११/०७/२०२४ रोजी त्यांचे विरुध्द पो.स्टे. पांढरकवडा जि. यवतमाळ येथे दाखल असलेल्या गुन्हयामध्ये अटक न करण्यासाठी, पीसीआर न घेण्यासाठी तसेच मदत करण्यासाठी पो.स्टे. पांढरकवडा येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भगत तक्रारदार यांना पाच हजार रुपयाची लाचेची मागणी करीत असल्याबाबत सविस्तर तकार दिली. सदर तकारीवरुन दिनांक १२/०७/२०२४ रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान तकारदार यांना त्यांचे विरुध्द पो.स्टे. पांढरकवडा जि. यवतमाळ येथे दाखल असलेल्या गुन्हयामध्ये अटक न करण्यासाठी, पीसीआर न घेण्यासाठी तसेच मदत करण्यासाठी ५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
आज दिनांक १३/०७/२०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान पंचासमक्ष सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रकाश भगत यांनी ५,०००/- रुपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. नमुद आरोपी विरुध्द पो.स्टे. पांढरकवडा, यवतमाळ येथे गुन्हा नोंद करण्याची प्रकिया सुरु आहे.
सदरची कार्यवाही मा.श्री. मारुती जगताप, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, श्री. अनिल पवार, अप्पर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, श्री. मिलींद कुमार बहाकर, पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. अमरावती, यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधिक्षक श्री. मंगेश मोहोड पोलीस अंमलदार शैलेश कडु, आशिष जांभोळे, राजेश मेटकर, अब्दुल वसिम, सुरज मेश्राम, पोउपनि प्रदिप बारबुदे यांनी पार पाडली.