सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : वणी विधानसभा क्षेत्रातील शहर व ग्रामीण भागात शिवसेना प्रणित युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या अथक प्रयत्नाने वणीतील युवकांची बैठक घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मजबूत करण्यासाठी युवकांना प्रेरित करून त्यांना राजकीय प्रवाहात आणण्यासाठी प्रवृत्त करून वणी शहरात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम वणी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख संजयभाऊ देरकर व अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वाखाली देरकर यांचे निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. वणी मतदार संघातील प्रमुख संजयभाऊ देरकर यांनी जुन्या सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत घेऊन त्यांच्या मार्गदर्शनात पुन्हा एकदा पक्षाला संजीवनी देवू व ताकत उभी करू असे सांगितले. दरम्यान,सर्व युवकांचे पक्षात उत्साहवर्धक स्वागत केले. यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी युवापिढी ही उध्दव साहेब ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित झाली असून, हजारो युवक पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. सुधिर ठेंगणे, रवि बोडेकर यांचा उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
वणी शहर व परिसरातील आकाश पेंदोर, मयूर निब्रड, वाशिम शेख, प्रकाश कांबळे, अशपाक शेख, तौसिफ खान,अक्षय पथाडे, तौसिफ शेख, विजय पेंदोर, विफेश साळुके, उमेश नरपांडे, आकाश मदाकलवार, इत्यादींसह मोठ्या प्रमाणात जय भवानी, जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणा देत युवकांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.