सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : देशात लोकशाही महोत्सवाला अगदी थाटात सुरुवात झाली आहे. दि.27 मार्च पर्यंत उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन दाखल करून लोकसभेच्या मैदानात दंड थोपटले आहे.जसा खोगीर कसलेला घोडा मैदानात उभा झाला आहे, तसा या घोडया पेक्षा खोगीर मोठया प्रमाणात उड्या मारताना दिसून येत आहे.
निवडणूक मैदानात उडी घेण्याची 27 मार्च पर्यंत मुदत होती. या मैदानात उड्या मारण्यासाठी खोगिरानाहीं संधी होती.मात्र त्यांनी ही संधी बिनशर्त सोडली आहे.या कालावधीत केवळ 36 जणांनी उडी घेतली होती, मात्र निवडणूक रिंगणातील 15 लोकांची शक्ती पाहून इतरांनी आपली माघारी घेतली आहे कोणत्याही मैदानातील खेळात हार जीत हे ठरलेला भाग असताना रिंगणात उडी मारून आपली ताकद आजमावणे हे खेळाडूचे कर्त्यव्य आहे.
विशेष म्हणजे जीखेळाडू मैदानात दंड थोपटून उभे आहेत त्यांना लोकशाही मोहोत्सवात रंग उधळण्याचा अधिकार आहे. आता मात्र, माघार घेण्याची संधी हुकली असून यापलीकडे कोणालाही हा मैदान सोडून पळ काढता येणारच नाही. या सामन्यात उडी घेण्यासाठी कसरत व अभ्यास करावा लागतो यानंतरच तो कसोटीवर खरा उतरतो आहे.या सामन्यामध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रतिभाताई धानोरकर, महायुतीचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार तथा वंचीत बहुजन आघाडी चे अधिकृत उमेदवार राजेश बेले यांचे सह 12 खेळाडू कायम आहे.
दरम्यानच्या काळात चमचेगीरांची फौज इकडून तिकडे लुडबुड करताना दिसून येत आहे. पक्षाच्या निष्ठावंताना या चमचेगिरानी मागे टाकले असून सोशल मिडिया वर तर यांनी चांगलीच धूम्माकूळ घातला आहे.या रिकाम टेकड्यापायी त्रस्त असून हा उसने तत्वज्ञान सोशल मिडियावर फिरवताना आढळून येत आहे. डाव साधण्यासाठी सुरु असलेली मेहनत निष्ठावंत ओळखून आहेत.दिवसा एका पक्षात तर रात्री दुसऱ्या पक्षात हा अनेकांना आढळून येत आहे.
"तोंड लपवून तत्वज्ञानाची खैरात" या पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिसू नये म्हणून त्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना तोंड लपवून आपल्या बेचव ज्ञानाची खैरात वाटत फिरताना दिसत आहे.गाडी एकाची आणि भोजन दुसऱ्याचे खाण्यासाठी हा चमचेगीर तालुक्यात शहरापासून ग्रामीण भागात भटकंताना दिसत आहे. मात्र निवडणूक कालावधी कोणालाही दुखावता येत नाही या करणाखाली त्याची चलती दिसून येत आहे.