सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : यवतमाळ जिल्ह्यात होत असलेल्या आत्महत्या ह्या चिंतेचा विषय आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होणं हा जास्तच चिंतेचा विषय आहे, अश्यातच काल रासा (ता.वणी) परिसरात एका शालेय विद्यार्थिनींने आत्महत्या केल्याची मनाला चटका लावून गेली.
ज्योत्स्ना अय्या आत्राम (15) असे नाव असून मुळची पेंढरी, (ता.मारेगांव) हिने काल सायंकाळी दि.20 जानेवारी ला रासा शेत शिवारात गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली. ही बाब घरच्या मंडळींना लक्षात आली असता त्यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. घटनेची वणी पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली असून, आज सकाळी दि.21 जानेवारी रोजी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार मृतक ही रासा (ता. वणी) या गावात परिवारासह रहायची. ती अल्पवयीन मुलगी आठव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. शालेय शिक्षण घेत असताना जोत्स्नाने एवढ्या कोवळ्या वयात आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का? उचलले हे अजनही अनुत्तरित असून, पुढील तपास मारेगांव पोलीस करीत आहे.