Page

आजपासून मारेगावात काँग्रेसचे आमरण उपोषण

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरी शंकर खुराणा, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आकाश बदकी व ग्रामपंचायत सदस्य अंकुश माफूर हे आज सकाळी 12.30 वाजेपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत.

जगाच्या पोशिंद्याला 24 तास वीज पुरवठा मिळत नसल्याचा आरोप करत काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर या अघोषित लोड शेडींग मधून मुक्तता मिळावी आणि त्यांची दिवाळी गोड व्हावी, त्याच बरोबर मारेगाव तालुक्यात 132 के. वि. चे नवीन उपकेंद्र लवकर तयार करण्यात यावे, ग्राहकांची संख्या लक्षात घेता नवीन विद्युत केंद्राची मान्यता देण्यात यावी, 33 के.वि. चे नवीन वनोजा (देवी), कुंभा, वेगाव, रोहपट येथे उपकेंद्र करण्यात यावे, मारेगाव तालुक्यात सोलर प्लांट तयार करून जास्तीत जास्त विद्युत तयार करण्यात यावे, शेतकऱ्यांचे विज बिल पूर्णतः माफ करण्यात यावे, बेमाप विज बिल व पठाणी वसुली त्वरित थांबविण्यात यावी, ग्रामीण भागातील गांवठाण वरील विद्युत तारा व पोल देखभालचे काम त्वरित सुरु करण्यात यावे, शेतकऱ्यांचे नवीन A.G. चे कनेक्शन त्वरित जोडणी करून देण्यात यावी. या शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी मारेगाव तालूका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.
मारेगाव तालुक्यातील MSEB उपविभागाकडून होत असलेली विजेची 'लोड शेडींग' बंद करून शेतकरी व तालुक्यातील जनतेला न्याय मिळण्यासाठी वरील मागण्या मंजूर होय पर्यंत मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे. तीन दिवसाचा अल्टीमेटम दिल्या नंतर ही तीच स्थिती असल्यामुळे आता काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर या त्रासापासून मुक्ती मिळावी आणि बेमाप विज बिल व पठाणी वसुली त्वरित थांबविण्यात यावी. यासह अन्य मागणीसाठी ऐन दसऱ्याच्या एक दिवसा अगोदर पासून मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, सभापती गौरी शंकर खुराणा, यु. कॉ ता. अध्यक्ष आकाश बदकी व ग्राम. सदस्य अंकुश माफूर (सोमवार) आजपासून पोलीस वेलफेअर भारत पेट्रोलियमच्या समोर,मार्डी चौक येथे आज सकाळी 12.30 वाजेपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत.