Page

एटीएम सेवा कोलमडली, मारेगावकरांना सहन करावा लागतो विस्कळीत सेवेचा मनस्ताप!

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : एटीएम (ATM) च्या साहाय्याने पैसे काढणे, पैसे जमा करणे त्याचप्रमाणे आपल्या बँक खात्याची स्टेटमेंट काढणे तसेच बँक खात्यामध्ये किती पैसे आहेत हे तपासणे अश्या प्रकारची कामे या कार्ड द्वारे केल्या जातात. वेळेची बचत व काम पटकन होतं म्हणून या एटीएम कडे लाभ घेण्याचा एटीएम धारकांचा जास्त कल असतो. मात्र हिच सेवा कोलमडली तर किती मनस्ताप होतो हे सध्या मारेगावकर अनुभवतेय.

मारेगाव तालुक्याची ठिकाणी असलेले दोन्ही एटीएम कधी बंद तर कधी कॅश नसल्याने एटीएम ची विस्कळीत झाली आहे यामुळे एटीएम धारक ग्राहकांना या विस्कळीत सेवेचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मारेगाव शहरात स्टेट बँक ऑफ इंडिया व सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे केवळ दोन एटीएम मशीन आहे. परंतू सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे एटीएम (ATM) मागिल काही महिन्यापासून बंद असून स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम सुरु असले तरी त्यामध्ये रोख रक्कम नसणे तसेच त्या एटीएम मशीनवरील बटनाच दबल्या जात नसून त्यामुळे अनेकवेळा चुकीचे आकडे समोर येतात यामुळे ग्राहकांना पैसे काढताना गोंधळ निर्माण होतो त्यामूळे व्यवहार होण्यास अडचणी येत आहे.
   
तरी संबधित यंत्रणेने लक्ष देऊन एटीएम (ATM) सेवा सुरळीत करावी अशी मागणी एटीएम धारक ग्राहक करीत आहे.