Page

जैताई मंदिरात मार्गदर्शन व शंका निरसन कार्यक्रम संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वनिता समाजतर्फे शुक्रवारी भारतीय स्त्री शक्ती संघटन शाखा नागपूर यांचा मार्गदर्शन व शंका निरसन हा कार्यक्रम स्थानिक जैताई मंदिराच्या सभागृहामध्ये पार पडला.
त्यासाठी भारतीय स्त्री शक्ती संघटना शाखा नागपूरचा उपाध्यक्ष राधिका देशपांडे, संघटनेच्या कार्यकारणी सदस्या वर्षा देशपांडे, श्रद्धा श्रोती, सुनिता विद्वान उपस्थित होत्या. राधिका देशपांडे यांनी त्यांच्या संघटनेमार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची सखोल माहिती देत कळी उमलतांना विवाहपूर्व मार्गदर्शन, समुपदेशन केंद्र, बाल संकुल व मदत केंद्र,वाचक चळवळ या स्तुत्य उपक्रमाबद्दल सुसंबंध असे मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित महिलांच्या शंकांचे सुयोग्य निरसन केले. वणी मध्ये संघटनेची शाखा सुरू व्हावी अशी इच्छा व्यक्त केली.
यावेळी महिलांची उपस्थिती वाख्याण्याजोगी होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय सरपटवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदांती उंबरकर तर आभार राधा वैद्य यांनी केले.