सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
विजय किसन वाघाडे (22) रा खंडणी असे विषारी द्रव्य प्राशन केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने बुधवारी 1 मार्चला दुपारी राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केल्याचीघटना घडली. घटनेची माहिती वडील किसन वाघाडे व भाऊ अजय वाघाडे यांना कळताच लगेचच उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले असता, मात्र, उपचारादरम्यान बुधवारला सायंकाळी 8 वाजताच्या दरम्यान, त्याने अखेरचा श्वास घेतला.
त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्याचे पाठीमागे आई-वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे. विजय यांचे पार्थिवावर आज गुरुवारी खंडणी येथे 3 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे असे निकटवर्तीयांनी माहिती दिली.