सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर
शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सहाय्यक अनुदान देण्यासाठी पात्र संस्थांकडून कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या महसूल विभागातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
विहित नमुन्यातील अर्ज आणि नियम http://www.mahasanskruti.org/ या संकेतस्थळावर नवीन संदेश या शीर्षकाखाली उपलब्ध आहे. संस्थांनी अर्ज सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, महात्मा गांधी मार्ग, मुंबई- 400032 या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2023 असून त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार होणार नसल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले आहे.