Page

प्रसाद कंदकुरीवार यांचे नागपूर येथे उपचारादरम्यान निधन

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : अत्यंत दुःखद, राजुर कॉलरी येथिल माजी उपसरपंच  रविभाऊ कंदकुरिवार यांचे लहान बंधू प्रसाद नरेंद्रजी कंदकुरीवार यांचे दि. 20 फरवरी 2023 वणी येथे अपघात झाला होता, नागपूर येथे उपचारादरम्यान काल रात्री त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते ४३ वर्षाचे होते. त्यांच्या अशा निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. 

शहरातील चिखलगाव रोडने पायदळ जात असताना एका अज्ञान वाहनाने पाठीमागून ठोस मारल्याने प्रसाद कंदकुरीवार यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जखमी अवस्थेत नागपूर येथे खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा डिश केबल चा व्यवसाय होता. प्रसाद यांचे पश्चात पत्नी व दोन मुली, आई वडील, दोन भाऊ असा आप्त परीवार आहे.