Page

इंडियन स्कॉलर्स अकॅडमी (बदकीस कॉन्व्हेन्ट) मध्ये राज्यगीतास झाली सुरुवात

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनापासून “जय जय महाराष्ट्र माझा” या महाराष्ट्र गीताचा स्वीकार करण्यात येत असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सामान्य प्रशासन विभागाने 1 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात महाराष्ट्र राज्य गीताची घोषणा करण्यात आली आहे. या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2 नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून “जय जय महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्र गीत 19 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र राज्याच्या राज्य गीताचे गायन संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गायनास सुरुवात झाली.

मार्डी येथील इंडियन स्कॉलर्स अकॅडमी (बदकीस कॉन्व्हेन्ट) मध्ये “जय जय महाराष्ट्र माझा” या राज्यगीतास सुरुवात झाली आहे. असे बोलतांना अकॅडेमीचे गौरव बदकी यांनी आवर्जून 'सह्याद्री चौफेर' सांगितले.