सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : शहरातील दि वसंत जिनिंग सभागृहात 26 फेब्रुवारीला संपन्न होणाऱ्या उद्घाटन सोहळ्या पूर्वी आज 25 फेब्रुवारीला नवोदित पत्रकार, पत्रकारिता क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या आणि समाजातल्या जाणत्या वर्गासह शिक्षक, वकील यांच्यासाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आशिष खूलसंगे यांचे हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.
मराठी भाषा प्रमाण, शुद्धलेखन, व्याकरण याबरोबरच प्रसार माध्यमे या विषयाचा व्यासंग असलेले विचारवंत, व्याख्याते, कवी, लेखक, खर्डे पत्रकार, निर्भीड वक्ता आणि लेखनिक म्हणून ज्याची संपूर्ण विदर्भात ख्याती आहे.
असे प्रा. दिपक गोविंद रंगारी यांच्या कार्यशाळेचे, व्हॉइस ऑफ डिजिटल मीडिया या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून वणी शहरात वसंत जिनिंगचे हॉलमध्ये आज सकाळी 11. वाजता आयोजन करण्यात आले आहे. सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.