Page

शिरपूर पोलिसांनी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : शिरपूर पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असलेल्या कायर परिसरातील इंड्स कंपनीचे आयडिया व जिओ प्रोव्हाडर मोबाईल टॉवर च्या चोरट्यांनी पिकअप वाहनातून बॅटऱ्या चोरून नेल्याचे तक्रार कर्त्याने तक्रार देताच पोलिसांनी चोरटे चोरी करून पळालेल्या मार्गाने त्यांचा पाठलाग केला असता पोलिसांना काही अंतरावर पिकअप वाहन थांबवून वाहनाची झडती घेतली असता त्यात चोरी केलेल्या बॅटऱ्या आढळून आल्या. ही कार्यवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनात 24 डिसेंबरला रात्री 12 ते 1 वाजताच्या सुमारास करण्यात आली.
चंडिका माता मंदिराजवळ असलेल्या इंडस टॉवर कंपनीच्या सेल्टर रूम मधून चोरट्यांनी 2 व्होल्ट क्षमतेच्या 24 बॅटऱ्या चोरून नेल्याची माहिती कंपनीचे टेक्निशियन गोपाल सुभाष सोलव (25) रा. रविनगर वणी यांनी शिरपूर पोलिसांना दिली. या प्रकरणी चोरी केलेल्या बॅटऱ्यासह पिकअप वाहन व तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी मो. शाहिद दाऊद शेख (38), मो. युनूस रहमुद्दीन शेख (30), शेख आसिफ शेख सुबान (22) रा. तिघेही रा. बल्लारपूर जि. चंद्रपूर यांच्यावर भादंवि च्या कलम 379,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी आरोपींसह मुद्देमाल ताब्यात घेतला. 1 लाख 67 हजार रुपये किमतीच्या 24 बॅटऱ्या पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केल्या आहे. व चोरीकरिता वापरलेले पिकअप (MH 34 AV 2059) वाहन पोलिसांनी जप्त केले असून पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे.