Page

नवरगाव जवळ दुचाकी, मुपेड व ट्रकला अपघात, मुपेडस्वार 'ऑन द स्पॉट'


राजू डावे | सह्याद्री चौफेर

वणी : शिरपूर पोलीस स्टेशन च्या हद्दीत नवरगाव जवळ दोन दुचाकीस्वाराचा व ट्रक ला अपघात झाला. यात मुपेड स्वार जागीच ठार झाला असून दुसरा दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळ काढला असून ही घटना वणी कायर राज्य मार्गांवर दीड वाजताच्या दरम्यान, घडली असा कयास आहे. घटनेची वार्ता सर्वत्र पसरताच बघ्याची एकच गर्दी घटनास्थळी उसळली होती. 

मृतक प्रभाकर दामोदर घुगुल (57) रा. बोपापूर ता. झरी येथील रहिवाशी आहे. सूत्राच्या माहितीनुसार एम एच 29 ए जे 2578 या क्रमांकाचे मुपेड स्वार वणी कडे काही कामानिमित्त जात होते. अशातच दुचाकी क्र.एम एच 29 बि एम 1661 हे भरधाव (हिरो) दुचाकी स्वार कायर कडे येत असतांना घुगुल यांच्या मुपेडला जोरदार धडक दिली, असा प्राथमिक अंदाज घटना स्थळावरुण वर्तविला जात आहे. विशेष म्हणजे या दुचाकी व मुपेडच्या विचित्र धडकेत विटा घेवून जाणाऱ्या ट्रकने दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या चक्कर मध्ये विटाने भरलेला लोड ट्रक पलटी झाला,असे बोलल्या जात आहे. यात ट्रक चालकांला किरकोळ जखमा असून पुढील उपचारार्थ रवाना झाला.

दरम्यान, वणी कायर राज्य महामार्गांवर घडलेल्या घटनेत प्रभाकर घुगुल हे जागीच ठार झाले असून धडक देणारा दुचाकीस्वार घटना स्थळावरून पसार झाला, घटनेची माहिती शिरपूर पोलीसांना मिळताच ते घटना स्थळी दाखल होऊन वृत्त लिहीपर्यंत पंचनामा सुरु होता. या दरम्यान, बघ्यांची एकच गर्दी ओसंडल्याचे चित्र पहायला मिळाले असून काही काळ या मार्गांवरील ट्रॅफिक जाम झाले....