Page

मोकाट जनावरांचा उच्छाद; वाहनचालक धोक्‍यात

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मोकाट आणि हिंस्र बनलेल्या जनावरांच्या झुंडींमुळे शहरवासियांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वाहनचालकांचे जीव धोक्‍यात आलेत. वर्षभरात अनेक अपघात झाले आहेत. कित्येक प्राण्यांना जीवही गमवावा लागला. मोकाट जनावरांना पकडणे, मालकांचा शोध घेण्याची मोहीम नगरपंचायतने हाती घेतलेली आठवत नाही. त्यामुळे रस्त्यांवरील जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त आहे. 

दरम्यान, मोकाट जनावरांसाठी केंद्र व राज्याने पारित केलेल्या कायद्याचीही नगरपंचायतने अंमलबजावणी करावी, अशी मागणी सामान्य माणसांची आहे. दि 2 सप्टेंबर ला सायंकाळी शहराच्या मुख्य मार्गांवरून पश्चिमे जात असतांना संतोष भाऊराव बलकी (55) रा. मारेगाव यांच्या मुफेड गाडी च्या समोर मोकाट असलेली लंगलंग फिरणारी जनावरे एकदम आडवी आल्याने त्यांची गाडी मध्यभागातील डिव्हाडर वर आदळली. यात त्यांच्या मुफेड गाडीचे समोरचे चाकाच्या वरचे टफ्फर तुटले, सायंकाळची वेळ आणि रहदारी असल्यामुळे लोकांच्या नजरेत पडल्याने लगेच नागरिक त्यांच्या मदतीला धावले. बर झालं बलकी यांना काहीच लागले किंबहुना दुखापत झाली नाही, परंतु गाडीचे थोडक्यात नुकसान झाले.

अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढला असताना मोकाट जनावर शहराच्या मुख्य मार्गांवर हिंडत फिरत आपलं ठाण मांडून बसतात या कडे मात्र,नगर पंचायतचे लक्ष नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.