प्रदीप गावंडे | सह्याद्री चौफेर
पुणे : आदिवासी पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती (Fellowship) द्या अशी मागणी बिरसा क्रांती दल संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव आदि चिंधू आढळ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राज्यात नामांकित विद्यापीठांत किमान ५०० आदिवासी विद्यार्थ्यी पीएच. डी.चे संशोधन करत आहेत सदर विद्यार्थ्यी सर्व सामान्य कुटुंबातील असलेल्याने त्यांना आर्थिक अडचणी येत आहेत सदर विद्यार्थ्यांना आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थेकडून संशोधन अधिछात्रवृत्ती चालू केल्यास त्यांना आर्थिक मदत होईल व संशोधन पुर्ण करण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही.सदर विद्यार्थ्यी मागास, दुर्गम, डोंगराळ भागातील असून या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्याची नितांत गरज आहे.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आयुक्तांनी ८५ कोटी ९ लक्ष १७ हजार रुपयांचा सुधारित प्रस्ताव तयार करून १७ मार्च २०२२ रोजी शासनाकडे पाठविला आहे परंतु पाच महिने लोटून गेले तरी या प्रस्तावावर मंजुरी मिळाली नाही तरी त्यावर योग्य ती कार्यवाही करून सदर विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी आग्रही विनंती.
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण मानव विकास संस्था पुणे (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी अधिछात्रवृत्ती सुरू केली आहे. त्याच प्रमाणे अनुसूचित जमातीतील संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती (Fellowship) द्या अशी मागणी आदि चिंधू आढळ यांनी शासनाकडे केली आहे.